मुंबई : वुमन वेल्फेअर फोरम, मुंबई या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या पुरस्कार प्रस्तावांमधून प्रा. प्रदिप जानकर यांची “आदर्श युवा प्राध्यापक” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
संस्थेचा २५ वा वर्धापन दिन रविवार, दि. २९ मे २०२२ रोजी सायं. ४:३० वा. देवदीगा हॉल, ७० ए, हिंदतेज बिल्डिंग, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व) येथे होणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जानकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
“आपण करीत असलेल्या कार्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपली निवड योग्य व सार्थकी ठरेल असा विश्वास वाटतो”, असे मत संस्थेने जानकर यांच्या निवडीवर व्यक्त केले आहे.