मुंबई : भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली या संस्थेला भारतातून प्राप्त झालेल्या पुरस्कार प्रस्तावांमधून प्रा. प्रदिप जानकर यांची ‘महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२३’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
अकादमीची ३९ वी राष्ट्रीय परिषद डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे होणार आहे. सदर परिषदेत मान्यवरांच्या हस्ते जानकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. “आपण शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपली निवड योग्य व सार्थकी ठरेल असा विश्वास वाटतो”, असे मत अकादमीने जानकर यांच्या निवडीवर व्यक्त केले आहे.