मुंबई : मुंबईमध्ये ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठित प्रो डेंटल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन डेंटल समुदायात क्रीडा माध्यमातून ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणा-या या लीगचे मेडिकाबाजार हे अग्रगण्य प्रायोजक आहेत. यंदा या लीगचे दुसरे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ४०० दंत चिकित्सक फूटबॉल, क्रिकेट, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरमसारख्या मोठ्या खेळांमध्ये सहभागी होतील. ‘द लीग’ म्हणून प्रसिद्ध असणा-या या लीगकरिता मेडिकाबाजारतर्फे स्पर्धक विजेत्यांचा आणि उपविजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल.