New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्या सर्वांना अभिवादन केले जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने देशभरात स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या देशव्यापी चळवळीची मशाल प्रज्वलित केली, असे मोदी यांनी सांगितले. जे लोक दांडी यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे धैर्य, त्याग आणि सत्य आणि अहिंसेप्रति अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“ आज आपण त्या सर्वांना अभिवादन करत आहोत जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने देशभरात स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या देशव्यापी चळवळीची मशाल प्रज्वलित केली. जे लोक दांडी यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे धैर्य, त्याग आणि सत्य आणि अहिंसेप्रति अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”