
नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
‘एक्स’वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा ठसा कायम राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्रवर्ग आणि अमेरिकेच्या जनतेप्रती माझ्या मनापासून संवेदना.”















