नवी दिल्ली, 27 मार्च 2021 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी होळीच्या पूर्वसंध्येला पाठवलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे: –
“होळीच्या शुभप्रसंगी मी देशातील आणि परदेशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो.
रंगांचा उत्सव होळी हा वसंत ऋतूचा एक प्रमुख सण देखील आहे. हा सामाजिक समरसतेचा सण आहे जो लोकांच्या जीवनात आनंद, समाधान आणि आशा घेऊन येतो. तो आपल्याला सामाजिक एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देतो. त्याचबरोबर तो लोकांना मैत्री, ऐक्य आणि समरसतेच्या पायावर बांधलेला नवा भारत घडवण्यासाठी एकत्र येण्यास प्रेरित करतो.
हा उत्साहाचा सण आपल्या सांस्कृतिक विविधतेचा अविभाज्य भाग असलेल्या राष्ट्रवादाची भावना आणखी मजबूत करो.”