मुंबई : भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज हवाई दलाच्या खास विमानाने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, पोलीस महासंचालक सतिश माथूर, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी बाजीराव जाधव, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.