नवी दिल्ली, 13 मार्च 2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी होळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे,
“भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी होळीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा देते.
होळी हा रंगांचा सण असून तो हर्षोल्हास आणि उत्साह घेऊन येतो. हा सण आपल्या जीवनात एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो. होळीच्या विविध रंगांतून विविधतेतील एकतेचे मूल्य प्रतिबिंबित होते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक देखील आहे. हा सण प्रेम आणि सकारात्मकता पसरवण्यास शिकवतो.
हा रंगांचा उत्सव तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येवो.”