New Delhi : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना ईस्टरच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “ईस्टरच्या मंगल प्रसंगी, देशवासियांना विशेषतः देशात आणि देशाबाहेरील ख्रिश्चन समुदायाला माझ्याकडून शुभेच्छा आणि अभिनंदन.”
येशु ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाची स्मृती करणारा हा सण जगभर आनंदाने साजरा केला जातो. मानवता, क्षमा, त्याग, करुणा आणि सत्य याचे प्रतिक म्हणजे येशु ख्रिस्त. त्यांच्या आयुष्पासून आपल्याला शांती, प्रेम आणि बंधुतेची शिकवण मिळते.