रत्नागिरी दि. 20:- जिल्ह्यामध्ये कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत “किमान कौशल्य विकास कार्यक्रमा”मध्ये सन २०२१-२२ करिता एकूण 1 हजार 410 उमेदवारांचे प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदरचे प्रशिक्षण कोर्स पुढील प्रमाणे – Fabricator, Iron & Steel Tungsten inert Gas welder (GTAW), Field Technician -AC, Goat Farmer, FishRetailerTropical, Subtropical Fruit Grower,Gardner cum Nursery Raiser, Bamboo Grower, Fishing Boat Mechanic, Hatchery Production Worker, Hatchery Manager, Hatchery Operator, Home Delivery Boy , Housekeeping Executive, Guest House Care Taker, Multi-Cuisine Cook, Heritage Tour Guide, Airline Customer Service Executive ,Airline Cabin Crew,Self Employed Tailor, BeautyTherapist,Hand Embroider,Fruit Pulp Processing Technician ,Fish and Seafood processing technician, Packing Machine worker Food Processing, Courie Delivery Executive, Domestic Data Entry Operator, Two-Wheeler Service Technician, Four-Wheeler service Technician.इत्यादी राबविण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कोर्स राबविणेकरीता TP/TC म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. करिता याद्वारे इच्छुक संस्था/इंडस्ट्रीज/महाविद्यालये/आस्थापना यांनी वरील नमूद प्रशिक्षण कोर्सचे अनुषंगाने स्किल इंडिया पोर्टलवर (SIP) सूचीबद्ध असणे आवश्यक आहे.
इच्छुक संस्थानी त्वरित स्किल इंडिया पोर्टलवर नमूद प्रशिक्षण कोर्सचे अनुषंगाने सूचीबद्ध व्हावे जेणेकरून नियानुसार त्यांना प्रशिक्षण बॅच देण्यात येईल व प्रशिक्षण राबविणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांनी करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी नागेश सितारे (जिल्हा कौशल्य विकास समन्वयक) कार्यालय नं. 02352 221478 मो. 9970520250 यांना संपर्क साधावा.














