चिपळूण : शिवभक्त कोकण व निल क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील उद्योजक प्रशांत यादव यांचा मुंबई येथे साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे. दि. २६ मे रोजी सकाळी ९.३० वा. मान्यवरांच्या हस्ते प्रशांत यादव यांचा सन्मान होईल. यावेळी ‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ बनविणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणला, वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस्च्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनण्यासाठी मदतीचा हात देणारा आणि संपूर्ण कोकणची अर्थक्रांती बदलणारा हा प्रकल्प ठरणार आहे. कोकणाला नवसंजीवनी देणारा वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. या संदर्भात प्रशांत यादव प्रकल्पाचा परिचय करून देणार आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. सलग पाच दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. गिरगाव चर्नीरोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात सकाळी ९.३० वा. हा कार्यक्रम सुरू होईल. या सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विकास भुवड, केतन किंजळकर, दिनेश चव्हाण, संभाजी धुमक, अनिल किंजळकर, कल्पेश जाधव, प्रदीप घर्वेकर, प्रथमेश भुवड, प्रविण करंडे, वैभव पड़ये व या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता युयुत्स आर्ते व निलेश किजळकर मेहनत घेत आहेत. प्रशांत यादव यांना व्यावसायिक सन्मान जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.