मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोट निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. त्यांना 209 मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे दिलीप माने यांना 73 मते मिळाली. या निवडणूकीत एकुण 284 आमदारांनी मतदान केले. त्यापैकी दोन मते बाद झाली.
नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी महाराष्ट्र विधान परिषदेची पोट निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत एकुण 284 आमदारांनी मतदान केले. एकुण 288 सदस्यांपैकी एम आय एम पक्षाचे वारिस पठाण आणि इम्तियाझ शेख हे दोन सदस्य मतदानास अनुपस्थित होते. सदस्य छगन भुजबळ हे उपस्थित राहू शकले नाहीत, तर राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना न्यायालयाच्या निर्देशांनुसार मतदान करता आले नाही.
आज सकाळी 9 ते 4 या वेळेत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मतदान पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यानंतरमतमोजणीला सुरूवात होऊन निर्णय जाहीर करण्यात आला.