मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आ. राज पुरोहित, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह तसेच दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.