रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करुनही शासनाने दुर्लक्ष केल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर आज महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामसेवक युनियन शाखेच्यावतीने धरणे आंदोनल करण्यात आलं. ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी हे पद नेमून वेतन त्रुटी दूर कराव्यात. समान काम वेतन लागू करावे, ग्रामसेवक संवर्गास शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रवासभत्ता दर महिन्याला 1500 रुपये मिळावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी, 2011 च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी सजे व नेमणुका होणे आवश्यक आहे. 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना जूनी पेंशन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक वेतनवाढ देणे किंवा एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक नेमणूक करावी, ग्रामसेवक संवर्गातील अन्य यंत्रणांची कामे कमी करावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.