रत्नागिरी (आरकेजी)- अंबेनळी बस अपघात प्रकरणी अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच जबाबदार असून त्यांना विद्यापीठातून बडतर्फ करुन सीआयडी मार्फत चौकशी आणि नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला २८ ऑगस्ट रोजी अंबेनळी घाटात अपघात झाला. अपघातात बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात घटनेने शोककला पसरली होती. मात्र, अपघातातून वाचलेला प्रकाश सावंत प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया देण्यात व्यस्त होता. सहकार्यांच्या मृत्यूचे त्याला जराही दुखः नव्हते. हा अपघात ज्या ठिकाणी होऊन बस दरीत कोसळली, तिथला पूर्ण भाग हा कातळ भाग आहे. तिथे मातीचा लवलेशही नव्हता. ट्रेकर्सहि सहजरित्या येथून वर चढू शकत नाही, मग प्रकाश कोणत्याही साधनाशिवाय वर कसा येऊ शकतो. पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचे प्रकाश सांगतो. मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि हाच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला. त्यामुळे अशा व्यक्तीला विद्यापीठाच्या सेवेत ठेवणे योग्य आहे का? याची बदली करुन चालणार नाही. त्याला सेवेतून बडतर्फ करून सीआयडी मार्फत ही चौकशी करावी. शिवाय, त्याची नार्को टेस्टही केली जावी. यात तो दोषी आढळल्यास त्याला फाशी

द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.