मुंबई : मुंबईतील एका झोपडपट्टी पूनवर्सन योजनेत विकासकाला बेकायदेशीरपणे भरमसाठ आर्थिक लाभ पोहचवण्याच्या हेतूने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बेकायदा मंजुरी देत भ्रष्टाचार केला, असा आरोप करत मुलुंड येथे शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी महेतांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अलीकडेच उघड झालेली झोपडपट्टी योजनेतील भ्रष्टाचारांची प्रकरणे ही देखील गृहनिर्माण मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.