एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. ‘व्हेलेंटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमीयुगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग सध्या यु-ट्यूबवर चांगलेच व्हायरल झाले आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित असलेले हे गाणे प्रेमातील नात्याला खास बनवणारे ठरतं आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत ‘फिलिंग्स’ या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले आहे. किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा प्राजक्ता – भूषण वर आधारित हे गाणे प्रेमाची भावना अधिक खुलावणारे ठरत आहे.
पहिली भेट –
https://www.youtube.com/watch?v=hgCkRxL-Zgw&t=1s पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
किती सुंदर दिसतेस तू –
https://www.youtube.com/watch?v=Ct3oLQZx9eA पाहण्यासाठी येथे क्लिक करा.