मुंबई : जिव्हाळा आणि भावना बहुद्देशीय संस्था, नाशिक या संस्थेला महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या पुरस्कार प्रस्तावांमधून प्रा. प्रदिप जानकर यांची “दीपस्तंभ आणि ज्ञानज्योती पुरस्कार २०२२” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
संस्थेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम डिसेंबर महिन्यात नाशिक येथे होणार आहे. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जानकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
“आपण शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपली निवड योग्य व सार्थकी ठरेल असा विश्वास वाटतो”, असे मत संस्थेने जानकर यांच्या निवडीवर व्यक्त केले आहे.