
मुंबई : इंटरनेटच्या वाढत्या प्रसारासह देशात प्रादेशिक भाषांतून निर्माण होणा-या सामग्रीचे (कन्टेन्टचे) प्रमाणदेखील वाढले आहे. देशातील महिलाही प्रादेशिक भाषांमधून विविध विषयांवर व्यक्त होत असल्याचे भारतातील सर्वात मोठा यूझर्सनी जनरेट केलेला कंटेण्ट मंच मॉम्सप्रेसो डॉटकॉमने नमूद केले आहे. विविध भाषांमध्ये टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओसारख्या भिन्न स्वरूपांमधून महिलांना व्यक्त होण्याची संधी हा मंच देतो. या मंचावर निर्माण होणारी सुमारे ६५ टक्के सामग्री ही प्रादेशिक भाषांमधून येत असते.
या मंचावर गेल्या १२ महिन्यांत मराठी भाषेत सामग्री निर्माण करणारे ७ पटींनी, हिंदीतील ३ पटींनी, बंगालीतील ३.३ पटींनी आणि तामीळमधील ५ पटींनी वाढले आहेत. याच अवधीत प्रादेशिक भाषा-आधारित सामग्रीचे योगदान ३८% पासून वाढून ६२% झाले आहे. हे ब्लॉगर्स आरोग्य, तान्हे मूल, गर्भधारणा, पाककृती, प्रवास आणि राहणीमान, सौंदर्य आणि फॅशन यांसारख्या विविध विषयांवरील सामग्री तयार करत असून यात ‘मॉम्स लाइफ’ हा ब्लॉग सर्वात लोकप्रिय आहे. यात मातांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, म्हणजे नातेसंबंध, मुलांचे पालन-पोषण (पॅरेन्टिंग), करियर पर्याय त्याबद्दल लिहिलेले असते.
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे विविध भौगोलिक प्रांतांतील महिला आपापल्या प्रांतीय भाषेत कंटेण्ट तयार करू शकत आहेत. मॉम्सप्रेसो.कॉमच्या डेटाशी हे पडताळून पाहता, असे आढळून आले आहे की त्यांच्या मोबाइल अॅपवरून तयार केलेल्या प्रादेशिक सामग्रीचे योगदान जे २०१८ मध्ये ७०% होते ते वाढून २०१९ मध्ये ९४% झाले आहे.
मॉम्सप्रेसो.कॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल गुप्ता म्हणाले, “मॉम्सप्रेसो.कॉममध्ये जानेवारी २०१७ मध्येच हिंदी भाषा लॉन्च करून या ट्रेंडचा फायदा घेणा-यांतत आम्ही अग्रेसर होतो. तेव्हापासून आम्ही आणखी ८ भारतीय भाषा सादर केल्या आहेत आणि आमच्या वापरकर्त्यांच्या वाढीवर प्रादेशिक भाषांचा फार मोठा प्रभाव दिसून आला आहे. आम्हाला मिळणार्या ८५ दशलक्ष मासिक पेज व्ह्यूज पैकी ८५% पेक्षा जास्त व्ह्यूज हे आमच्या ९ प्रादेशिक भाषांमुळे आहेत. हे पाहता २०२१ पर्यंत भारतीय भाषांचे यूझर्स हे भारतीय इंटरनेट यूझर-बेसच्या ७५% इतके असतील. प्रादेशिक भाषांच्या भावी क्षमता निर्विवादपणे प्रचंड आहेत.”















