मुंबई – ख्यातनाम चित्रकार आणि व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर ह्यांच्या “मेरीगोल्ड” ह्या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांच्या हस्ते २५ मार्च रोजी पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर, विजय चोरमारे उपस्थित होते.
काळाघोडा येथील आर्मी नेव्ही इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन ३१ तारखे पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. मिलिंद गवळी यांनी प्रदीप ह्यांचे याप्रसंगी कौतुक करताना त्यांच्या बहुतेक चित्रामध्ये दोन आकार असतात जे प्रकृती किंवा जीवन घडविणार्या स्त्रोताचे प्रतीक म्हणता येईल. त्यांच्यासारख्या कलाकाराने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. इथे जमले आहेत त्यात बरेच कलाकार आहेत आणि मला स्वतः ला कलाकार असल्याचा अभिमान आहे. याचं कारण कलाकार मंडळी असतात ती या समाजा मधले संतुलन कायम राखत असतात. सध्याच्या काळात कलाकार मंडळींपुढे मोठी आव्हान आहेत. ह्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. मान्यवरांंना दिव्यांग मुलांनी तयार केलेली कागदी झेंडूची फुलं दिली गेली, या गोष्टीचे सुद्धा त्यांनी कौतुक केलं. अष्टगंध प्रकाशन च्या संजय शिंदे यांनी प्रदीप हे चित्रकार, व्यंगचित्रकार आहेतच, शिवाय लेखक आणि कवी सुद्धा आहेत, त्यांच्या “चौथी सीट” ह्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन आपण करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. सर्व मान्यवर मंडळींनी आपल्या भाषणातून प्रदीप यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी एक कार्यशाळा घेवून आम्हाला सुद्धा चित्र काढायला शिकवावं असं मत प्रदर्शित केलं. प्रदीप हे दिव्यांग मुलांसाठी अशा तर्हेची कार्यशाळा घेत असतात हे विशेष आहे. सदर प्रदर्शनातील चित्र विक्रीला आहेत आणि काही लिलावा साठी. ह्यातून मिळणारे पैसे हे “सेव्ह आर्ट” ह्या संस्थेला आणि काही सेवाभावी संस्थांना दिले जाणार असल्याचं भगवान ह्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं.सूत्रसंचालन संदीपा यांनी नेटके केले. सदर समारंभाला सौ मिलिंद गवळी यासुद्धा हजर होत्या.