Mumbai : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, समाजसुधारक, विचारवंत, लेखक व प्रभावी वक्ते प्रबोधनकार ऊर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर व इतर मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १७ सप्टेंबर २०२१) सकाळी प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीमती पेडणेकर यांच्यासह उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, नगरसेवक श्री. अमेय घोले तसेच उपआयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे, महानगरपालिका चिटणीस श्रीमती संगीता शर्मा हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.















