ठाणे : निवृत्त न्यायाधीश प्रभाकर तिकोणे लिखीत “शिक्षणासाठी दाही दिशा” या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच श्रीरंग विद्यालय, ठाणे येथे लोकपाल एम्. एल्. तहलियानी यांनी केले. या कार्यक्रमास निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनंत मेढेकर तसेच ख्यातनाम समुपदेशक चंद्रकांत पागे उपस्थीत होते. या पुस्तकात स्वत:च्या शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष व त्याच्याच जोरावर प्राप्त केलेले ‘मेट्रोपाॅलिटीन मॅजिस्ट्रेट’ पद या दरम्यानचे अनुभव विशद केले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. पालकांसाठीदेखील काही महत्त्वाच्या सूचना यात अंतर्भूत केल्या आहेत.