किंमत ३४.९९ लाख रूपयांपासून, तसेच तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध: स्टाइल, स्पोर्टलाइन आणि लॉरिन अॅण्ड क्लेमेण्ट
- स्फटीकयुक्त घटकांच्या विशिष्ट वापरासह कोडियकने स्कोडा एसयूव्ही डिझाइनशैलीला परिभाषित केले आहे
- शक्ती व कार्यक्षमतेच्या दुहेरी क्षमतेसह नवीन २.० टीएसआय इंजिन, तसेच ७ स्पीड डीएसजी आणि ४x४ क्षमता
- वैशिष्ट्यांनी संपन्न नवीन स्कोडा कोडियकमध्ये भारतीय ग्राहकांना मूल्यवर्धित लग्झरी तत्त्वाचा अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रायव्हिंग गतीशीलता
- सेगमेंट-फर्स्टप्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सर्व ट्रिम्समध्ये प्रमाणित ९ एअरबॅग्ज
- सेगमेंट-फर्स्ट डायनॅमिक चेसिस कंट्रोल (डिसीसी), जे ६ ड्रायव्हिंग मोड्सची सुविधा देते
- फास्टमूव्हर: ७.८ सेकंदांमध्ये प्रतितास ० ते १०० किमी गती प्राप्त करते
मुंबई, १० जानेवारी २०२२: स्कोडा कोडियकने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केल्याच्या चार वर्षांनंतर स्कोडाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या एसयूव्हीमध्ये अधिक परिस्कृत व आकर्षक डिझाइनशैलींसह सुधारणा केली आहे. इंजिन, चेसिस, ड्रायव्हिंग गतीशीलता, सुरक्षितता, इन-केबिन एंटरटेन्मेंट व कनेक्टिव्हीटी आणि आरामदायी व लग्झरी वैशिष्ट्यांमध्ये अधिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच कोडियकमध्ये पूर्णत: नवीन शक्तिशाली, पण कार्यक्षम २.० टीएसआय पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये प्रतिसादात्मक ७-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. ज्यामुळे चारही चाकांना शक्ती मिळते. ही कार आता देशभरातील शोरूम्समध्ये ३४.९९ लाख रूपये (एक्स-शोरूम, भारतभर) या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. नवीन स्कोडा कोडियक स्टाइल, स्पोर्टलाइन व लॉरिन अॅण्ड क्लेमेण्ट व्हेरिएण्ट्समध्ये सात-आसनांसह उपलब्ध आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक श्री. झॅक होलिस म्हणाले,”कोडियकचा आमच्या एसयूव्ही मोहिमेची अग्रणी मॉडेल असण्याचा संपन्न, आंतरराष्ट्रीय वारसा आहे. कोडियक उपस्थित असलेल्या इतर बाजारपेठांप्रमाणे भारतामध्ये एसयूव्ही एैसपैस जागा, उपकरणाची व्यापक श्रेणी आणि पैशाचे मोल करणारे सर्वोत्तम तत्त्व यासाठी वरचढ ठरते. नवीन स्कोडा कोडियकसह आम्ही आकर्षक डिझाइन, आरामदायी सुविधा, इंजिन व डायनॅमिक क्षमता निर्माण करण्यासह केबिनमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्यांची भर करत आहोत. विविध विभाग अग्रणी वैशिष्ट्ये आणि तडजोड न करणा-या सुरक्षिततेसह स्कोडा कोडियक दैनंदिन ड्रायव्हिंग असो किंवा ऑफ-रोड साहसी कृत्ये असो कुटुंबासाठी परिपूर्ण लग्झरी पॅकेज आहे.”
नवीन स्कोडा कोडियक: प्रबळ एक्स्टीरिअर्स
रिडिझाइन केलेले फ्रण्ट व रिअर, नवीन ऑफ-रोड वैशिष्ट्ये आणि षटकोनी स्कोडा ग्रिलसह नवीन स्कोडा कोडियकमध्ये आता अधिक प्रबळपणाची भर करण्यात आली आहे. कोडियकमध्ये नवीन बोनेट आहे, फ्रण्ट व रिअर बंपर्स आकर्षक रंगांसह येतात आणि हेड व टेललाइट क्लस्टर्समध्ये नवीन कॉस्मेटिक व कार्यक्षमतेची भर करण्यात आली आहे. हेडलाइट्समध्ये आता स्कोडा क्रिस्टलाइन एलईडींसह इल्युमिनेटेड आयलॅशेस् आणि मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंटीकेटर्स आहेत. तसेच नवीन रिअर स्पॉइलर डिझाइन मोठ्या एसयूव्ही ऐरोडायनॅमिक्सला सानुकूल करते. ४५.७२ सेमी (आर१८) चाकांसाठी विभिन्न स्टाइलचे अलॉईज सर्व व्हेरिएण्ट्ससाठी अद्वितीय असतील.
नवीन स्कोडा कोडियक: आलिशान इंटीरिअर्स
स्टाइल व लॉरिन अॅण्ड क्लेमेण्ट व्हेरिएण्ट्समध्ये रिअर सीट लग्झरी असण्यासोबत एलअॅण्डकेसाठी स्टोन बिज लेदर पर्फोरेटेड अपहोल्स्टरी आहे, तसेच आतील व बाहेरून बाजूने क्रोम आहे.
स्पोर्टलाइनमध्ये अधिक ड्रायव्हर-केंद्रित सुविधांसह ऑल ब्लॅक आकर्षक इंटीरिअर्स, ३-स्पोक फ्लॅट-बॉटम स्पोर्ट स्टीअरिंग व्हिल, अधिक साइड बोल्स्टरींग, एकीकृत हेडरेस्ट्स आणि उत्साही कॉर्नरिंगसाठी विस्तारित शोल्डर सपोर्ट स्पोर्ट सीट्स आहेत. तसेच आतील भागातील आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये अधिक भर म्हणून १२-वे अॅडजस्टैबल इलेक्ट्रिक सीट्ससह एलअॅण्डकेमध्ये इन-बिल्ट कूलिंग व हिटींग आहे. नवीन आकर्षक थीमला अधिक पुढे घेऊन जात स्कोडा कोडियकमध्ये थ्री किंवा टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, अॅम्बियण्ट लायटिंगसह अत्याधुनिक कॅन्टॉन ६२५ वॅट १२-स्पीकर ऑडिओ सिस्टिमसोबत सबवूफर आहे. तसेच ग्राहक दुरूनच खिडक्या, डोअर मिरर्स आणि नवीन पॅनोरॅमिक सनरूफ उघडू व बंद करू शकतात.
नवीन स्कोडा कोडियक: इंजिन व गतीशीलता
नवीन स्कोडा कोडियकची खासियत म्हणजे शक्तिशाली व कार्यक्षम २.० टीएसआय इंजिन. १४० केडब्ल्यू (१९० पीएस) शक्ती आणि ३२० एनएम टॉर्क देणारे इंजिन स्कोडा कोडियकला फक्त ७.८ सेकंदांमध्ये प्रतितास १०० किमीची ग्रती प्राप्त करून देते (क्लेम फिगर). या ऑल-टेरेन लग्झरी एसयूव्हीच्या ड्रायव्हिंग गतीशलतेमध्ये प्रोग्रेसिव्ह स्टीअरिंग अधिक भर करते. ते ड्रायव्हिंग स्थिती व वाहनाच्या गतीनुसार बल देते, ज्यामुळे कोडियक कमी गती असताना देखील उत्तम ड्रायव्हिंग आनंद देते आणि उच्च गती असताना ड्रायव्हिंगवर उत्तम नियंत्रणाची खात्री देते.
तसेच विभागात पहिल्यांदाच एलअॅण्डकेमध्ये ऑफर करण्यात आलेले डायनॅमिक चेसिस कंट्रोल (डीसीसी) कोडियकच्या ऑन-रोड व ऑल-टेरेन गतीशीलता क्षमतांमध्ये भर करते. डीसीसी ड्रायव्हरला इको, कम्फर्ट, नॉर्मल, स्पोर्टस्, स्नो व इंडिव्हिज्युअल ड्रायव्हिंग मोड्समधून निवड करण्याची सुविधा देते. डीसीसीमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटसाठी डिझाइन करण्यात आलेले ड्युअल-शेल, गॅस-लिक्विड शॉक अॅब्जॉर्बर्स आहेत. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट सतत प्रदेशावर देखरेख ठेवते आणि प्रत्येक धक्का सहन करण्यासाठी सानुकूल डॅम्पिंग वैशिष्ट्ये देते. ज्यामधून सुलभ व सातत्यपूर्ण राइडची खात्री मिळते. हँडलिग वैशिष्ट्ये कोडियक सारख्या पूर्ण आकाराच्या एसयूव्हीला चपळ, कार-सारखी गतीशीलता देतात.
नवीन स्कोडा कोडियक: कनेक्टीव्हीटी आणि इन्फोटेन्मेंट
कार्स आपल्या कनेक्टेड जीवनांचा भाग बनत असताना नवीन स्कोडा कोडियकमध्ये २०.३२ सेमी इन्फोटेन्मेंट टचस्क्रिनसह इनबिल्ट नेव्हिगेशन आणि मायस्कोडाकनेक्ट अॅपच्या माध्यमातून संपूर्ण कनेक्टीव्हीटी आहे. कारमधील कनेक्टीव्हीटीमध्ये अधिक वाढ करणारी वैशिष्ट्ये आहेत पुढील प्रवाशांसाठी उपलब्ध होणारे आधुनिक यूएसबी सी पोर्टस्,मागील प्रवाशांच्या सोईस्करतेसाठी १२ व्होल्ट सॉकेट, फोनसाठी वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्लेसाठी सपोर्ट.
स्कोडा कोडियक: ड्रायव्हर इंटरफेस
नवीन कोडियक ड्रायव्हरला सुस्पष्ट व विनाव्यत्यय इन्स्ट्रूमेंट रिडआऊट्सची देखील खात्री देते. स्टाइल व्हेरिएण्टमध्ये ४ अॅनालॉग डायल्स व डिजिटल रिडआऊट्स आहेत, जे ड्रायव्हरला आवश्यक माहिती देतात. स्पोर्टलाइन व एलअॅण्डके ट्रिम्समध्ये पूर्णत: प्रोग्रामेबल व्हर्च्युअल कॉकपीटसह डिजिटल डायल्स व डिजिटल कन्सोल आहे, जे ड्रायव्हरच्या गरजांना सूट होईल अशा पाच थीम्ससह२६.०३ सेमी मीडिया इंटरफेसशी पूरक आहे.
नवीन स्कोडा कोडियक: अद्वितीय सुरक्षितता
व्हेरिएण्ट्मध्ये आकर्षकता, साहित्य व रंगाच्या बाबतीत विविधता असली तरी तिन्ही व्हेरिएण्ट्समध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. तिन्ही व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुरक्षितता तंत्रज्ञान आहे. प्रमाणित ९ एअरबॅग्जसह स्कोडा कोडियकमध्ये अॅडप्टिव्ह फ्रण्ट हेडलाइट्स, ऑटोमॅटिक डिमिंग एक्स्टीरिअर (ड्रायव्हरच्या बाजूला) व सर्व पारदर्शक पृष्ठभागांवर डिफॉगिंग, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल व हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, स्टेबिलिटी कंट्रोल, मल्टी-कोजिलन ब्रेकिंग आणि पार्क असिस्टसह हँड्सफ्री पार्किंग अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. तसेच प्रमुख एलअॅण्डकेमध्ये प्रमाणित म्हणून हिल डिसेंट कंट्रोल व ३६०-ड्रीग्री कॅमेरा आहे.
नवीन स्कोडा कोडियक: स्टोरेज आणि कार्यक्षमता
नवीन कोडिकमधील नवीन वैशिष्ट्यांमध्ये अधिक भर म्हणून ४०:२०:४० स्प्लिटमध्ये दुस-या रांगेतील सीट्स आणि ५०-५० स्प्लिटमध्ये तिस-या रांगेतील बॅकरेस्ट आहे, जे पूर्णत: फोल्ड करता येते, ज्यामुळे जागा, स्थिरता व विविधतेमध्ये वाढ होते. एसयूव्हीमध्ये डबल डॅशबोर्ड स्टोरेज, अंडर स्टीअरिंग स्टोरेज आणि फ्रण्ट सेंटर आर्मरेस्ट स्टोरेज आहे. तसेच पूर्ण-आकाराच्या सात-आसनी नवीन कोडियकमध्ये स्टोरेज क्रेविसेस, होल्डर्स व सामनासाठी एैसपैस जागा आहे. कोडियकमध्ये प्रमाणित म्हणून पुढील बाजूस प्रकाशित व कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि मागील बाजूस २७० लिटर्स बूट स्पेससह सात सीट्स आहेत. शेवटच्या सीट्स फोल्ड करता येत असल्यामुळे ग्राहकांना ६३० लिटर्स स्टोरेज सुविधा मिळते. मोठ्या प्रमाणात सामान घेऊन जायचे असेल तर नवीन कोडियकमध्ये मागील बाजूच्या पाचही सीट्स फोल्ड करून व्यापक २००५ लिटर्स सामानाची जागा उपलब्ध होऊ शकते. ज्यामुळे नवीन कोडियक परिपूर्ण, लग्झरी, ऑल-टेरेन फॅमिली मूव्हर ठरते.
नवीन स्कोडा कोडियक: सिम्प्ली क्लेव्हर
स्कोडा कोडियकमध्ये इतर काही लहान, पण अविश्वसनीयरित्या विचार केलेल्या वैशिष्ट्यांच्या सिम्प्ली क्लेव्हरचा समावेश करण्यात आलेला आहे. छत्रींबाबत बोलायचे झाले तर कोडियकमधील प्रत्येक फ्रण्ट डोअरमध्ये प्रसिद्ध अम्ब्रेला वेट केस असण्यासोबत ड्रायव्हरसाठी एक छत्री आहे. तसेच प्रमाणित म्हणून व्हर्च्युअल पॅडलसह इलेक्ट्रिक टेलगेट आहे, जे युजर्सना पायाच्या हालचालीसह रिअर बूट चालू व बंद करण्याची सुविधा देते, ज्यामुळे सामान वाहून नेताना किंवा बूट स्पेसमध्ये खरेदी केलेल्या वस्तू ठेवताना चावी किंवा बटन्सचा शोध घेण्याची गरज भासत नाही.
लांबच्या प्रवासादरम्यान आरामदायीपणाच्या खात्रीसाठी कोडियकमध्ये पॉवर नॅप पॅकेजसह ब्लँकेट आहे, जे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देते. कोडियक लांबच्या प्रवासादरम्यान सुलभ व आरामदायी प्रवासाची खात्री देते. स्कोडा ऑटोमध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत जसे ए-पिलरमध्ये तिकिट-होल्डर, इल्युमिनेटेड व कूल्ड ग्लोव्हबॉक्स, डॅशबोर्ड स्टोरेज आणि फ्रण्ट बोटल होल्डरसाठी ईजी ग्रिप मॅट.
कोडियक स्कोडा ऑटो इंडियाच्या २०२२ मधील प्रबळ उत्पादन धोरणाचा शुभारंभ करेल आणि वर्षभरात उत्पादनासंदर्भात सतत कृती करण्यात येतील. रेंजमध्ये प्रमुख कृती, प्रबळ विक्री धोरण, प्रबळ नेटवर्क विस्तारीकरण योजना, नाविन्यपूर्ण विक्री-पश्चात्त उपक्रम आणि ग्राहक-केंद्रितवर अधिक फोकससह स्कोडा ऑटो इंडियाने या डायनॅमिक ऑटोमोटिव्ह बाजारपेठेमध्ये प्रवेश केल्यापासून २०२२ ला भारतातील सर्वात मोठे वर्षबनवण्यासाठी प्रबळ धोरण तयार केले आहे.