मुंबई : ‘एम/पूर्व’ विभाग प्रभाग क्र. १४१ चे कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार, दि. ०९ जानेवारी २०२० रोजी झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेना पक्षाचे विठ्ठल लोकरे यांनी ४ हजार ४२७ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश (बबलू) पांचाळ यांचा १३८५ मतांनी पराभव केला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश (बबलू) पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली. सदर पोटनिवडणूकीची आज (दि. १० जानेवारी २०२०) मतमोजणी करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची मतमोजणी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली.