रत्नागिरीत :अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी मार्फत जिल्हास्तरीय डाक अदालत 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत : टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु. पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे २१ मार्च २०१८ पर्यंत अथवा तत्पूर्वी अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.असं आवाहन डाकघर विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.