रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या सरकारने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. तेव्हा सरकारने ही महाविद्यालये बंद करू नये, या मागणीसाठी विद्यार्थ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. गरिब विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मोर्चेकर्यांनी केला.
रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात रत्नागिरीतील नागरिक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येत आंदोलन केले. सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला.