ठाणे : ठाण्यातील पूर्वद्रुतगती मार्गावर भरदिवसा प्राची विकास झाडे (२१) या तरुणीवर चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. हल्ल्यानंतर आरोपी फरारी झाला होता. मात्र नंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने जूनमध्ये तरुणीला धमकी दिली होती. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रारही दिल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास व कारवाई जलदगतीने करण्याची मागणी केली व त्यानंतर प्राचीच्या आई-वडिलांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले.
एकतर्फी प्रेमाच्या अशा अनेक घटना घडत असून त्यावर वेळच्या वेळी कारवाई होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सर्व पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अशा तक्रारींची पुन्हा पडताळणी करावी व आवश्यकता भासल्यास तक्रारदार महिलांना प्रत्यक्ष संपर्क करावा, अशी मागणीही अॅड. माधवी नाईक यांनी केली आ