रत्नागिरी, (आरकेजी) :चार कोटींचे केटामाईन ड्रग्ज जप्त करत चिपळूण पोलिसांनी तिघांना अटक केली. केटामाईन घेऊन एक तरूण शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणार होता. पोलिसांनी विरेश्वर कॉलनीत सापळा रचला. मोटारसायकलवरुन आलेल्या एका तरुणाच्या हालचाली संशायास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
संतोष कदम असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने ड्रग्ज रॅकेटची माहिती दिली. त्यानंतर स्वप्नील कोत्रे आणि मंगेश कदम या दोघांना अटक करण्यात आली. पकडलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल चार कोटी आहे. सुमारे पाच कीलो ७५ ग्रॅम केटामाईन पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिली.