मालाड, (निसार अली) : मालाड पोलिस ठाण्याचे पोलिस कमांडर श्रीकांत देशपांडे यांचा सन्मान चिन्ह आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी एक महिला इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होती. या बाबत महिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले व शिताफीने कमांडर श्रीकांत देशपांडे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले होते.त्यांच्या या कामगिरीची स्तुती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केली होती.
दिनांक 26 मार्च रोजी महाराष्ट्र पोलिस बॉईस असोसिएशन च्या वतीने देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी विनोद वाघमारे मुंबई उपाध्यक्ष,
सुनील खरे जिला अध्यक्ष, शहनावाज खान, लतीफ शेख, सचिन खंडाळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.