रत्नागिरी, (आरकेजी) : पोलीस नाईक सुधीर गोरे याला लाच घेताना लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गोरे गुहागर पोलीस स्थानकात कार्यरत होता.
मुलीचा पाठलाग करणा-या एका तरुणाविरुद्ध गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल करुन कोठडीत न ठेवण्यासाठी या मुलाकडून सुधीर गोरेने 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 9 हजार रुपये देण्याचे ठरले. याचा 6 हजार रुपयाचा पहीला हप्ता स्विकारण्यासाठी सुधीर आज पोलीस स्टेशनबाहेरील रोडवर गेला. त्यावेळी लाचलुचपत विभागाने 6 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेतल्याप्रकरणी सुधीरला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान पोलीस कर्मचारीच लाच घेताना सापडल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.