मुंबई, १ एप्रिल २०२५: पोको हा भारतातील आघाडीचा ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड ‘द अल्टिमेट ब्लॉकबस्टर’ पोको सी७१ सह किफायतशीर स्मार्टफोन श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. खिशाला परवडणारा योग्य एंटरटेनर असलेला हा स्मार्टफोन ४ एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये त्याच्या श्रेणीमधील सर्वात मोठा, सर्वात स्मूद आणि सर्वात सुरक्षित डिस्प्ले – ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्प्ले, तसेच ट्रिपल टीयूव्ही सर्टिफिकेशन आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. प्रीमियम स्प्लिट ग्रिड डिझाइनमध्ये अधिक स्लीक व आधुनिक आकर्षकतेची भर करण्यात आली आहे, ज्यामुळे सी७१ स्टायलिश असण्यासोबत शक्तिशाली देखील आहे. आज पोको इंडियाच्या सोशल मीडिया हँडल्सवर ऑफिशियल केव्ही लाँच करत पोको सी७१ च्या पहिल्या लुकचे अनावरण करण्यात आले.