नवी दिल्ली : आपल्या झळाळत्या इतिहासात कोरुन ठेवण्याजोगे विशेष क्षण! चांद्रयान-2 च्या उड्डाणाद्वारे आपल्या वैज्ञाानिकांचे कौशल्य आणि प्रतिभेचे दर्शन घडत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आज अभिमानाचा क्षण आहे.
चांद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी अभियान आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर निश्चितच अभिमानाने भरुन आला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ‘लॅन्डर रोव्हर’ आणि ‘ऑरबिटर’ चाही या यानात समावेश आहे.
चांद्रयान-2 ही वैशिष्ट्यपूर्ण मोहिम आहे. या आधीच्या मोहिमांमध्ये अभ्यासल्या न गेलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास चांद्रयान-2 मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. हे अभियान चंद्राविषयी नवी माहिती देईल.
चांद्रयान-2 सारखे प्रयत्न आपल्या युवा पिढीला विज्ञान, सर्वोत्कृष्ट संशोधन आणि शोध यासाठी अधिक प्रोत्साहन देईल. यासाठी ‘चांद्रयान’ मोहिमेला धन्यवाद. भारताच्या चांद्र विषयक कार्यक्रमाला मोठी चालना मिळेल. चंद्राविषयीच्या आपल्या सध्याच्या ज्ञानात लक्षणीय वृद्धी होईल.