नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 11 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईत येणार आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या 56 व्या दीक्षांत समारंभाला ते संबोधित करणार आहेत. दीक्षांत समारंभानंतर आयआयटी मुंबई येथे पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र आणि ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.