नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.
“पंडित जवाहरलाल नेहरुंचे त्यांच्या जयंती दिनी सर्व देश त्यांची आठवण काढत आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत पंडित नेहरू यांनी दिलेले योगदान आणि भारताचे पहिले पंतप्रधान असतानांचा कार्यकाळ आमच्या सदैव स्मरणात राहील”, असे पंतप्रधान म्हणाले.