नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 मध्ये संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान म्हणाले, ‘2001 मध्ये आजच्याच दिवशी आपल्या संसदेवर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या शौर्याला आपण वंदन करतो. त्यांनी दाखवलेल्या धैर्य आणि साहस प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील.’