मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार तथा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, आमदार आशिष शेलार, तिन्ही दलाचे प्रमुख अधिकारी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते.
काल शनिवारी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या 56व्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले की, “मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान संस्थांच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीची एकेक वीट उभी केली तसेच प्रत्येक क्लिकद्वारे प्रगतीचा आलेख उंचावला.” ते पुढे म्हणाले की, “भारत सातत्याने नाविन्यकरणाचा निर्देशांक उंचावत असून भारतातील तंत्रज्ञान संस्था या परिवर्तनात्मकतेच्या आधारशीला आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था या जागतिक पातळीवरील भविष्याच्या तंत्रज्ञानाचा आरसा असून भारत स्टार्ट अपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.”
आज रविवारी पंतप्रधानांनी मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण केले.