नवी दिल्ली, 21 जून 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रमी संख्येने झालेल्या लसीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.आणि यासाठी आघाडीवरील कोरोनायोद्ध्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांची प्रशंसा केली आहे.
एका ट्विटमध्ये , पंतप्रधान म्हणालेः
”आज विक्रमी संख्येने झालेल्या लसीकरणाबद्दल आनंद आहे. कोविड -19.विरोधात लढण्यासाठी लस हे आपले सर्वात सामर्थ्यशाली अस्त्र आहे. ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अभिनंदन आणि बहुतांश नागरिकांना ही लस मिळावी हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने कठोर परिश्रम घेणाऱ्या आणि आघाडीवर काम करणार्या सर्व कोरोनायोद्ध्यांचे कौतुक.
वेल डन इंडिया ! “