नवी दिल्ली : www.pmindia.gov.in या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आसामी आणि मणिपूरी भाषेतील आवृत्त्यांचे 1 जानेवारीला अनावरण करण्यात आले. आसाम आणि मणिपूरमधील नागरिकांच्या विनंतीच्या अनुंषगाने आता हे संकेतस्थळ आसामी आणि मणिपूरी भाषेतही पाहता येईल.
आजच्या अनावरणानंतर पीएमइंडिया हे संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदीसह मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्ल्याळम, मणिपूरी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्येही उपलब्ध झाले आहे.
पुढील दुव्यांवरुन प्रादेशिक भाषेतील ही 11 संकेतस्थळे पाहता येतील.
आसामी :http://www.pmindia.gov.in/asm/
बंगाली:http://www.pmindia.gov.in/bn/
गुजराती:http://www.pmindia.gov.in/gu/
कन्नड:http://www.pmindia.gov.in/kn/
मराठी:http://www.pmindia.gov.in/mr/
मल्ल्याळम:http://www.pmindia.gov.in/ml/
मणिपूरी:http://www.pmindia.gov.in/mni/
ओडिया:http://www.pmindia.gov.in/ory/
पंजाबी:http://www.pmindia.gov.in/pa/
तामिळ:http://www.pmindia.gov.in/ta/
तेलगू:http://www.pmindia.gov.in/te/
नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या आणि त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या उपक्रमामुळे देशाच्या सर्व भागांमधील नागरिक आणि पंतप्रधान यांच्यात लोककल्याण आणि विकासासंदर्भात सुरु असलेला संवाद वाढेल, अशी अपेक्षा आहे.