नवी दिल्ली : पहिल्यांदाच झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यावर लिहिलेला अभिनंदनपर संदेश :
पहिल्यांदाच झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय त्यांचे अतुलनीय कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचे फलित आहे.
या विजयामुळे भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक खेळांपैकी एक असलेल्या असलेल्या खेळाकडे लक्ष वेधले गेले आहे, या विजयाने देशभरातील असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होवो.