
नवी दिल्ली : आशिया संघ महिला मुष्ठियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय मुष्ठियुद्धपटू मेरी कॉम हिचे अभिनंदन केले.“आशिया संघ महिला मुष्ठियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मेरी कॉमचे अभिनंदन. तुझ्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदीत झाला आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.















