New Delhi : मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी इथे भिंत तसेच दरड कोसळून झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 हजार रुपये सानुग्रह अनुदान देखील पंतप्रधान मदत निधीमधून जाहीर करण्यात आली आहे.
“मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी भागात भिंत कोसळून झालेल्या अपघातात लोकांचे जीव गमावल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या संकटाच्या प्रसंगी पीडित कुटुंबियांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो”
“ अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.” असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.