नवी दिल्ली : मुंबईतल्या डोंगरी येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
‘मुंबईतील डोंगरी येथे इमारत कोसळून झालेली दुर्घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहेत’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.