- मुंबई – राज्य सरकारने जाहिर केलेल्या प्लास्टिक बंदीची 100 टक्के अंमलबजावणी शनिवारपासून मुंबईसह राज्यभरात सुरू होणार आहे. त्यामुळे आता कापडी पिशवी घेऊनच घराबाहेर पडावे लागणार आहे. प्लास्टिक पिशवी किंवा बंदी घातलेल्या प्लास्टिकची वस्तू आढळल्यास पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात पाच हजार दंड वसूल केला जाणार असल्यामुळे नक्की लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे आता बंदीच्या पहिल्या दिवसापासूनच समजणार आहे.
राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर व्यापारी, उद्योजक ते फेरीवाले- छोट्या दुकानदारांपासून तडकाफडकी प्लास्टिक बंदीला विरोध केला. व्यापा-यांच्या संघटनांनी या विरोधात न्य़ायालय़ात धाव घेतली होती. मात्र उच्च न्य़ाय़ालय़ानेही या संघटनांची याचिक शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे राज्य सरकारने जाहिर केलेली प्लास्टिक बंदीच्य़ा निर्णयाची 100 टक्के अंमलबजावणी शनिवारी, 23 नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. त्यामुळे आता प्लास्टिक पिशव्या व इतर बंदी घातलेल्या वस्तू हद्दपार होणार आहेत. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडताना सवयीप्रमाणे प्लास्टिक पिशवी घेऊन निघणा-यांना कापडी पिशवी घेऊन निघावे लागणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होणार असल्यामुळे मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पालिकेचे आवाहन
– कापडी, खादी पिशवींचा वापर करा
– पाण्यासाठी स्टील, ग्लासची बॉटल सोबत ठेवा
– दूध, दही, मासे, मटण, चिकन खरेदीसाठी स्टिलचा डबा घेऊन जा
– घरातील प्लॅस्टिक एकत्र करून पालिकेचा टोल प्रâी क्रमांक १८०० २२२३५७ वर फोन करा.
– सिंगल यूज प्लॅस्टिकऐवजी रीयुजेबल वस्तूंचा वापर करा
– प्लॅस्टिकचा कचरा ओल्या कचर्यात टाकू नका
हे अधिकारीच कारवाई करणार ––
प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करताना कुणावर अन्याय होऊ नये, कुणाकडून गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी विशेष गणवेशधारी ओळखपत्र असलेले वॉर्ड निरीक्षक नेमण्यात आले आहेत. अशाच कर्मचार्यांना कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
असा आकारणार दंड —
– प्लॅस्टिक पिशवी किंवा यूज अॅण्ड थ्रो प्रकारच वन टाइम यूज होणारे प्लॅस्टिक वापरताना पहिल्यांदा पकडले गेल्यास पाच हजारांचा दंड, दुसर्यांदा पकडले गेल्यास १० हजारांचा दंड आणि तिसर्यांदा पकडले गेल्यास २५ हजारांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
– प्लॅस्टिकच्या पिशव्या, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, यूज अॅण्ड थ्रो प्रकारची कटलरी, हॉटेलमधील पार्सल नेण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर वापरल्यास या प्रकारचा दंड होणार आहे.