धूळवडीच्या वेळी वापरण्यात येणार्या सिंथेटीक रंगांमुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी पिडिलाइटने पर्यावरणस्नेही रंग बाजारात आणले आहेत. ‘रंगीला होली के रंग’ असे कंपनीच्या उत्पादनाचे नाव आहे. तेव्हा रासायनिक रंगाचा वापर करू नका, असे आवाहन कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी केले आहे. तसेच देशातील नागरिकांना त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीच्यावेळी तीन प्रकारच्या रंगांमुळे (पेस्ट, कोरडे व पाण्यात मिसळलेले) सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहातात असे गेल्या कित्येक वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. सिथेंटिक रंगांत आढळणारे लीड ऑक्साइड (काळा), मर्क्युरी सल्फाइड (लाल), अल्युमिनियम ब्रोमाइड (चंदेरी), कॉपर सल्फेट (हिरवा) आणि पर्शियन ब्लू (निळा) इत्यादी घटक आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. त्यात डर्मिटाइज (त्वचा लाल आणि चट्टे पडल्यासारखी होणे) व त्वचेच्या इतर विकारांपासून डोळ्यांना होणाऱ्या अलर्जीपर्यंत आणि कधी कधी अंशतः अंधत्व येण्यापर्यंतच्या दुष्परिणामांचा समावेश आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.
पर्यावरणस्नेही रंग त्वचेला लावून वापरल्यास ते धुणे अतिशय सोपे जाते आणि त्यामुळे जराही अपाय होत नाही. शिवाय, त्यांना मंद सुगंधही असतो, असे सिन्हा म्हणाले.
सुरक्षित आणि रंगीबेरंगी होळीसाठी सुरक्षा सिन्हा यांनी दिलेल्या सूचना
* पर्यावरणाला हानी न पोहोचवता होळी खेळा. लाकडाऐवजी भंगार जाळा.
* होळी खेळण्याआधी केस व त्वचेला तेल लावा. केसांना हानी पोहोचू नये म्हणून भरपूर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा.
* त्याशिवाय, बाजारात ब्रँडेड रंग उपलब्ध असतात, जे बिनविषारी आणि युरोपीय मानकांनुसार तयार केलेले आहेत. हे रंग वापरण्यासाठी तेल लावण्याची गरज नसते आणि ते सहजपणे धुता येतात.
* कानामागे, कानाच्या पाळ्यांमागे आणि नखांवरही तेल लावा. गडद रंगाचे नेलपॉलिश लावूनही नखांना सुरक्षित ठेवता येते.
*ओठ सुरक्षित ठेवण्यासाठी पिल बाम किंवा लिपस्टीक लावा.
* बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर टोनर लावून त्वचेवरील छिद्रे बंद करा. यामुळे रंग खोलवर जाणार नाही.
* होळी खेळण्याआधी अर्धा तास वॉटरप्रुफ सन्स्क्रीन लावायला विसरू नका. त्यानंतर मॉइश्चरायझर लावून मगच उन्हात बाहेर पडा.
*अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घाला. हे कपडे हलके आणि पटकन सुकणारे असू द्या. डेनीमसारखे जाड कापडाचे, लगेच न वाळणारे कपडे घालू नका.
*केस बांधण्यासाठी बंदाना किंवा स्कार्फचा वापर करा.
*आंघोळ करण्यापूर्वी अंगावरील सर्व कोरडा रंग झटकून टाका.
*चेहरा मॉइश्चरायझर क्रीम किंवा तेल अथवा दुधात बुडवलेल्या कापसाच्या बोळण्याने स्वच्छ करा व नंतर क्लीन्झर किंवा स्क्रब वापरा. *चेहऱ्याची त्वचा जोरजोरात धासून धुवू नका. त्यामुळे त्वचा खराब होईल आणि खाजही सुटेल.
*सौम्य शॅम्पू वापरून केस धुवा, पण अतिरिक्त शॅम्पू वापरू नका. एका धुण्यात केसांखालच्या त्वचेवरील रंग निघाला नाही, तर तो तसाच राहू द्या आणि एक- दोन दिवसांत केस परत धुवा. रंगीलासारखे बिनविषारी रंग केसांसाठी अजिबात अपायकारक नसतात.
*रंग आणि शॅम्पूमुळे टाळूवरील त्वचा कोरडी पडेल. म्हणून शॅम्पूनंतर कंडिनशर लावायला विसरू नका.