मुंबई : रंगांमुळे आपला मूड प्रसन्न होतो आणि त्यामुळे मन ताजंतवानं होतं हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच राष्ट्रीय कलरिंग बुक डे निमित्त फेविक्रिल या पिडीलाइटच्या ब्रँडने मुंबईला क्राउडसोर्स्ड (जनतेचा सहभाग असलेला) सर्जनशील बस- स्टॉप प्रदान करत मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यात नवेरंग भरले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत ब्रँडने त्यांच्या अडल्ट कलरिंग पुस्तकातील डिझाइन्स वापरून पॅनेल तयार करण्यात आले व त्याद्वारे कलाप्रेमींना त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ दिले. फेविक्रिल तज्ज्ञांनी पुस्तकातील डिझाइन्स ब्रँडच्या मालाड येथील हॉबी आयडियाज दालनातील ग्राहकांच्या मदतीने रंगवले. हाताने रंगवलेले हे पॅनेल कलरिंग डे साजरा करण्यासाठी हे पॅनेल इन्फिनिटी मॉल, मालाजजवळील बस स्टॉपवर लावण्यात आले.