दिल्ली, १२ ऑक्टोबर २०२२: पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) या इटालियन पियाजिओ ग्रुपच्या १०० टक्के उपकंपनीने, तसेच भारतातील लघु व्यावसायिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने व्हिलेज लेव्हल आंत्रेप्रीन्युअर्स (व्हीएलई)च्या माध्यमातून आपला तीन-चाकी व्यवसाय वाढवण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी) स्पेशल परपज वेईकलसोबत सहयोगाची घोषणा केली.
सीएससी योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत मिशन मोड प्रकल्पांपैकी एक आहे. हे देशभरातील ग्रामपंचायतींमधील जवळपास ४.५ लाख कॉमन सर्विस सेंटर्सचे स्वयं-शाश्वत नेटवर्क आहे. या सहयोगांतर्गत ग्राहकांना आता त्यांच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरद्वारे पियाजिओ वाहनांच्या पोर्टफोलिओशी संबंधित सर्व माहिती आणि खरेदी चौकशीसाठी सुविधा उपलब्ध होऊ शकते.
या सहयोगाबाबत बोलताना पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्रॅफी म्हणाले, ‘’आम्ही सीएससी सारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांचे स्वागत करतो, ज्याचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि डिजिटली समावेशक समाजाचा सरकारचा मनसुबा वाढवण्याचा व सक्षम करण्याचा आहे. हा सहयोग आम्हाला आमच्या लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्याच्या दिशेने पाऊल असेल. पियाजिओ जगातील ओरिजिनल थ्री व्हिलरची इन्व्हेंटर आणि भारतातील स्मॉल कमर्शियल वेईकलचा आघाडीचा ब्रॅण्ड आहे. कार्गो व प्रवासी उपयोजनांमध्ये तीन-चाकी पोर्टफोलिओच्या व्यापक श्रेणीसह ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी व इलेक्ट्रिक व्हेरिएण्ट्समधील उत्पादन ऑफरिंग असलेला एकमेव फ्यूएल अॅग्नोस्टिक थ्री व्हिलर ब्रॅण्ड आहे. या सहयोगासह विशेषत: ग्रामीण भागांमधील ग्राहकांना आता पियाजिओ वाहनांच्या त्यांच्या मालकीहक्कासाठी सीएससीच्या पाठिंब्याच्या माध्यमातून पियाजिओसह सुलभपणे कनेक्ट होता येऊ शकते.’’
याप्रसंगी बोलताना पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.च्या डॉमेस्टिक बिझनेस सीव्ही (आयसीई) अॅण्ड रिटेल फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व प्रमुख श्री. सजू नायर म्हणाले, ‘’आम्हाला व्हिलेज लेव्हल आंत्रेप्रीनयुअर्ससोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे, जे सीएससी योजनेच्या सुलभ कार्यसंचालनामध्ये मदत करत आहेत. पियाजिओ हा जनतेचा ब्रॅण्ड आहे आणि सीएससीसोबतच्या सहयोगासह आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू; या उपक्रमाला जवळपास ४.५ लाख व्हिलेज लेव्हल आंत्रेप्रीन्युअर्सचा पाठिंबा आहे, जे आम्हाला दर्जात्मक शेवटच्या अंतरापर्यंत परिवहन सोल्यूशन्स, तसेच रोजगार निर्मितीचे माध्यम देण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या कौशल्याचा लाभ घेण्यास मदत करतील.’’