
रत्नागिरी, 28 may : पॅजो कंपनीच्या वतीने रत्नागिरीतल्या साई ऑटो एजन्सीच्या माध्यमातून Ape रिक्षाधारकांना मदतिचा हात देण्यात आला आहे. जवळपास 60 Ape रिक्षाधारकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आज (गुरुवार) करण्यात आलं, तसेच सॅनिटाईझरही या रिक्षा चालकांना यावेळी देण्यात आलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल होताहेत. रिक्षाचालकांनाही सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कारण रिक्षा व्यवसायच ठप्प असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान अशा काही रिक्षा चालकांच्या मदतीला पॅजो कंपनी धावून आली. रत्नागिरीत गेल्या काही महिन्यांत ज्यांनी Ape रिक्षा खरेदी केल्या होत्या, अशा जवळपास 60 रिक्षाधारकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप रत्नागिरीतल्या साई ऑटो एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आलं. साई ऑटो एजन्सीचे मालक प्रकाश मयेकर यांच्या हस्ते या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यामध्ये 10 किलो तांदूळ, 5 किलो आटा, शिवाय डाळ, तेल, साबण, साखर, चहापावडर, कांदा, बटाटा, मसाला अशा जवळपास 16 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसेच सॅनिटाईझरही यावेळी या रिक्षाचालकांना देण्यात आलं. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी या रिक्षाचालकांनी पॅजो कंपनी तसेच साई ऑटो एजन्सीचे आभार मानले