रत्नागिरी : फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. याची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जिवंत जेरबंद केलं. मात्र फासकीत गंभीर जखमी झाल्याने थोड्याच वेळात बिबट्याने प्राण सोडले.