मुंबई, ५ मे : लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ आणि नजीकच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार युद्धाचे दिलेले संकेत याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर सोमवारी दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे ५.९४ टक्के आणि ५.७४ टक्के अशी मोठी घसरण झाली. सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये बँका, धातू, वाहन यांचा समावेश असून या सत्रात ७ टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी घसरले. अशा परिस्थितीत फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातून गुंतवणूकदारांना दिलास मिळाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
निफ्टी फार्मामध्ये १० पैकी ९ स्टॉक्स बाजार बंद होताना ग्रीन झोनमध्ये होते. ओरबिंदो फार्माने या नफ्याचे नेतृत्व केले. त्यानंतर सिपला, अलकेम लॅब्स आणि कॅडिला हेल्थने अनुक्रमे ३.७७ टक्के, २.४७ टक्के आणि १.९३ टक्क्यांनी वाढ नोंदवली. ट्रेडिंग सेशनमध्ये केवळ डिव्हिस लॅबोरेटरीजने घट दर्शवली. हे शेअर आज १.९६ टक्क्यांनी घसरले.
सर्वात वाईट परिणाम झालेल्यांमध्ये बँकिंग शेअर्सचा समावेश होता. निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी बँक आणि एस अँडपी बीएसई बँकेक्स अनुक्रमे ८.६ %, ८.३२% आणि ८.२५ % नी घसरले. एनएसई, आयसीआयसीआय बँकेने घसरणीचे नेतृत्व ११.०७ टक्क्यांवर केले. त्यानंतर फेडरल बँक, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेने अनुक्रमे ९.७३%, ९.६३% आणि ९.४६%ची घट दर्शवली. बीएसई, येस बँकेनेही ३.२२ % ची सर्वाधिक घसरण अनुभवली. सर्वच बँकिंग स्टॉक्स ५ टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी घसरले.
धातूंच्या शेअर्समध्येही घसरणीचा कल दिसून आला. एनएसईमधीलल हिंडाल्को इंडस्ट्रीज, वेदान्ता, जिंदाल स्टील पॉवर यासारख्या स्टॉकनी ट्रेडिंग सेशनमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त घट नोंदवली. निफ्टी मेटलमध्ये आज फक्त ४ स्टॉक्स ५ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीवर होते. त्यापैकी तीन (वेलस्पन कॉर्प, कोल इंडिया व रत्नमणी मेटल) ४% ते ५ % च्या रेंजमध्ये होते आणि एमऑइल ३.६३% नफ्यात होते.