रत्नागिरी, प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने रत्नागिरीतही निषेध आंदोलन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरीतील काँग्रेस भवन कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द झाली पाहिजेच असे फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय,ह्या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,जिल्हा चिटणीस तेजश्री गोतंम , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर,महिला तालुका अध्यक्ष रिजवाना शेख,प्रमोद सक्रे, युवकचे दर्शन सक्रे जयसिंग राऊत, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते